Subscribe Us

header ads

जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक

बीड स्पीड न्यूज 


जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक


बीड_ जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणात पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान १५ फेब्रुवारीला रात्री अटक केली. परळी शहरात ही कारवाई करण्यात आली असून, पकडलेल्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.याप्रकरणी २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. सुनील दिनकर गिते (५८, रा. हालगे गल्ली, परळी), उल्हास गणपतराव भारती (६४), त्र्यंबक दिगांबर नागरगोजे ( ६४, दोघे रा. माणिकनगर, परळी) यांना राहत्या घरातून सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व सहकाऱ्यांनी अटक केली.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, या कामांची ५ पथकांमार्फत चौकशी करण्यात आली होती. पथकाने १५ टक्के कामांची निवड तपासणीसाठी केली होती. एकूण ८१५ कामांपैकी १२३ कामे निवडण्यात आली. त्यातील १०३ कामांची तपासणी झाली असून, त्यातील ९५ कामांमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. पथक या कामांमध्ये तब्बल ९० लाखांची रक्कम वसूल पात्र असल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे आता ६२ कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून या रकमेच्या वसुलीसाठी विभागीय कृषी सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. तथापि, केवळ १५ टक्के कामांमध्ये ९० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आले. सर्वच कामांची तपासणी केल्यावर घोटाळ्याच्या रकमेचा तर आकडा वाढेलच, पण वसूल पात्र रकमेतही मोठी भर पडू शकते.
न्यायालयीन कोठडीत रवानगी दरम्यान, तीनही निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना १६ फेब्रुवारीला परळी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली, अशी माहिती पो. नि. हरिभाऊ खाडे यांनी दिली.रूपयांच्या वसुलीचे आदेश बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात कंत्राट संस्था आणि अधिकाऱ्यांवर तब्बल ९० लाखांची वसुली निश्चित केली आहे. ही रक्कम तातडीने भरण्यासाठी औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालकांनी कंत्राटदार संस्था व अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

असा आहे घोटाळा : एकूण कामे : ८१५ तपासणीसाठी घेतलेली कामे : १२३ तपासणी पूर्ण : १०३
अनियमितता असलेली कामे : ९५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा