Subscribe Us

header ads

हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप-सेवालाल महाराज जयंती गेवराईत उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 



हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप-सेवालाल महाराज जयंती गेवराईत उत्साहात साजरी    



गेवराई_बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव  सोहळ्यात गेवराई तालुक्यातील हजारो बंजारा बांधवांनी हजेरी लावली तसेच दोन हजार पेक्षा जास्त भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यामुळे सेवाभाया जयंती सोहळा लक्षवेधी ठरला. जय सेवालाल च्या जयघोषाने गेवराई शहर दुमदुमले होते. होते    देशाला 

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक अर्थिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात न्याय हक्क मिळाला नाही,त्यामुळे बंजारा समाज विकासापासून कोसो दूर आहे.बंजारा समाज बांधवांनी  संघटना व राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवावी. समाजाच्या भल्यासाठी   निस्वार्थी भावनेने संघर्ष 

करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्या.धर्मसत्ता मजबूत करूनच  बंजारा समाजाला संघटित करता येईल.गोर धर्म व सेवालाल महाराजांच्या पांढ-या झेंड्याखाली बंजारा समाज सुरक्षित राहील असे क्रांतीकारी विचार बंजारा समाजाचे ज्येष्ठ प्रबोधनकार विष्णूदास महाराज वडवणीकर यांनी मांडले.गेवराई शहरातील सेवालाल नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या संत सेवालाल 

महाराज जयंती सोहळ्यात महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते.गोर पीठावर जि.प.सभापती बाबुराव जाधव,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण,जि.प.सदस्य शरद चव्हाण,मा.जि.प.सदस्य शामराव राठोड,गोर सेना डॉक्टर विंगचे प्रदेश अध्यक्ष डॉ.जीवन राठोड,मा.पं.सदस्य जीवन 

राठोड,बंजारा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, डॉ.प्रदिप राठोड,डॉ.एकनाथ पवार,डॉ.अमोल राठोड, नि.पी.आय बाबुराव राठोड, नि.पिएसआय एम.टी.चव्हाण, नगरसेवक काशिनाथ पवार, रासपचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर वाघमोडे महाराज,प्रा.शाम कुंड, बी.जे.राठोड,गणेश चव्हाण, रामकिसन राठोड,सोपानराव पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंतराव राठोड यांनी केले.अध्यक्षीय भाषणात 

प्रा.पी.टी.चव्हाण यांनी आपल्या आक्रमक शैलीतील भाषणातून बंजारा बांधवांना मार्गदर्शन केले.निवृत अधिकारी कर्मचारी यांनी आता समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे आणि खेकडावृती सोडून बंजारा समाजानी तांड्यावरील मुलभूत प्रश्नांसाठी लढत असलेल्या नेत्याला भक्कम साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्यात बंजारा समाजातील निवृत्त अधिकारी कर्मचारी, विविध दवाखान्यात रूग्णांची सेवा करीत असलेले डॉक्टर व नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन एमबीबीएस साठी पात्र ठरलेले गुणवंत विद्यार्थी असे एकूण शंभर पेक्षा 

जास्त समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते आदरपूर्वक सत्कार  करण्यात आला.सेवालाल नगर मधील समाईक जागेवर संत सेवालाल महाराज,याडी मरियामा देवीच्या मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गेवराईचे आमदार अँड.लक्ष्मण अण्णा पवार,माजी राज्यमंत्री बदामराव पंडित,माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जयंती सोहळा प्रसंगी सदिच्छा भेट देऊन संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित बंजारा बांधवांना शुभेच्छा दिल्या.बंजारा समाजाचे नेते प्रा.पी.टी. चव्हाण यांच्या पुढाकाराने पंचवीस वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात आणि तेरा वर्षांपूर्वी गेवराई शहरातील सेवालाल नगर मध्ये संत सेवालाल महाराज जयंतीची सुरुवात झाली होती,ती आजतागायत अखंडितपणे, थाटामाटात संपन्न होत आहे,या गोष्टी बद्दल समाज बांधवांनी कौतुक केले.जयंती सोहळा पार पडल्यानंतर दुपारी तीन ते रात्री उशिरापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त भाविक भक्तांनी (शिरा भात राबडी) महाप्रसादाचा लाभ घेतला.संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी डॉ. विश्वनाथ राठोड,बी.एम.राठोड, आर.डी.पवार,एल.जी.जाधव, आबासाहेब राठोड,सहकार्यानी यांनी खुप मेहनत घेतली.याप्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी कृष्णा राठोड,संजय चव्हाण,गोर सेनेचे योगेश पवार, राजेंद्र सांगळे,बंजारा क्रांती दलाचे बबन राठोड,शिवाजी राठोड, सरपंच युवराज जाधव,मा.उपसरपंच रघुनाथ राठोड,अप्पासाहेब चव्हाण, छगन पवार,अंबादास चव्हाण, देवराव राठोड,रमेश जाधव,दत्ता राठोड,विठ्ठल चव्हाण,परमेश्वर राठोड उपस्थित होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी अंकुश चव्हाण, विठ्ठल राठोड,अर्जून जाधव, गुलाब राठोड,सुदाम राठोड, मदन पवार,बी.टी.राठोड,अचित जाधव,बी.जी.राठोड,अनिल राठोड, बाबासाहेब राठोड, रावसाहेब चव्हाण,स्वप्निल चव्हाण,एकनाथ राठोड,कल्याण राठोड, प्रकाश जाधव,लहू चव्हाण,संजय चव्हाण यांनी तन-मण-धनाने योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा