Subscribe Us

header ads

फेसबुकवर मुलीसोबत प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार;शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

बीड स्पीड न्यूज 


फेसबुकवर मुलीसोबत प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार;शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

बीड_ शहरातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख झाली. यातून झालेल्या मैत्रीतून तरुणाने तिला पळवून नेले. त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट किरायाने करून अत्याचार केला. या तरुणाला 16 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.शेख समीर शेख अजिमोद्दीन (21, रा. तेलगाव नाका, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवर नववीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला घेऊन बीडमधून पलायन केले. पुण्यातील कात्रज परिसरात फ्लॅट किरायाने करून ते तेथे राहिले. या दरम्यान त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.11 रोजी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात बेपत्ताची नोंद केली. उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, पो. ना. मोहसीन शेख यांनी तांत्रिक माहिती आधारे 16 रोजी कात्रज पोलीस चौकीपुढील एका हॉटेलमध्ये शेख समीरला पकडले. पीडित मुलीसह त्याला घेऊन पथक 17 रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचले. मुलीच्या जबाबवरून बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी दिली आहे.

सिमकार्ड बदलून पोलिसांना गुंगारा

दरम्यान, आरोपी शेख समीर हा सतत सिमकार्ड बदलत
होता त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे  पोलिसांना अडचणीचे ठरत होते. मात्र, अखेर शिवाजीनगर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा