Subscribe Us

header ads

वक्फ जमीन घोटाळ्यात आष्टीतील बड़े मासे; नायब तहसीलदार, मंडळाधिकाऱ्याला अटक

बीड स्पीड न्यूज 


वक्फ जमीन घोटाळ्यात आष्टीतील बड़े मासे; नायब तहसीलदार, मंडळाधिकाऱ्याला अटक

आष्टी_ तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहार प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आणखी एका बड्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकाऱ्याला पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे, मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. चिंचपूर येथील वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळ्या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपासणी करत आहे. आष्टी पोलिसांनी तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे, मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड या दोघांना आज पहाटे २:३० वाजेच्या सुमारास अटक केली. या दोघांची काही दिवसांपूर्वी एसआयटीने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. आज दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.यापूर्वी चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहब यांच्या २२ हेक्टर ४९ गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन. आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनीच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुरनं.२०५/२०२१ कलम १०९, ४०९, ०,४६ ४६८, १२० ३४ भादं वि. सह कलम ५२ अ वक्फ अधिनियम १९५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा