Subscribe Us

header ads

परळीतील महिलेच्या हत्येप्रकरणी माजलगावच्या सावकारावर खूनाचा गुन्हा

बीड स्पीड न्यूज 


परळीतील महिलेच्या हत्येप्रकरणी माजलगावच्या सावकारावर खूनाचा गुन्हा



परळी_परळी शहरात काल शनिवारी (दि. २६) रोजी एका ५० वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. तर या हल्ल्यात त्या महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली होती. हा खून आर्थिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी माजलगावच्या एका सावकारावर परळी ग्रामीण ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, खून करून स्वत: आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला परळी ग्रामीण पोलिसांनी काही तासात बेड्या ठोकल्या.भरदिवसा झालेल्या या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मदिना मज्जीद शेख (वय ५०, रा. मोहंमदीया कॉलनी) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. त्यांची मुलगी शेख मुस्कान हिच्या फिर्यादीनुसार, तिच्या आईने एजाज शेख (रा. माजलगाव) याच्याकडून दोन लाख रूपये घेतले होते. शनिवारी रोजी  ३.३० वाजता. तो मदिना शेख यांच्या घरी आला. पैशाचा हिशोब शेतात जाऊन करूत असे म्हणून एजाज आणि मदिना पायी चालत मलकापूर गावाजवळील एका वीटभट्टीसमोर गेले. त्या ठिकाणी माझे दोन लाख रूपये आत्ताच दे असे म्हणत एजाजने मदिनासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. आत्ता जवळ पैसे नाहीत, नंतर देते अशी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न मदिनाने केला असता एजाजने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावर मदिनाने तुला काय करायचे ते कर असे म्हणताच एजाजने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि मदिनाच्या पोटात चाकूने वार केले. हे पाहून मुस्कान आईच्या बचावाला धावली आणि तिने एजाजला रोखण्याचा प्रयत्न केला असता एजाजने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात मदिना शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर मुस्कान गंभीर जखमी झाली. यावेळी मुस्कानचा आरडाओरडा ऐकून तिचे नातेवाईक धावून येत असल्याचे पाहून एजाजने पळ काढला. त्यानंतर नातेवाईकांनी जखमी मुस्कानला शासकीय रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुस्कानच्या फिर्यादीवरून एजाज शेख याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

भीतीपोटी एजाजने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा घेतला होता निर्णय

मदिनाचा खून केल्यानंतर भीतीपोटी एजाजने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका नातेवाईकाला फोन केला आणि तो धर्मापूरी जवळील रेल्वे पटरीकडे गेला. याबाबत त्याच्या नातेवाईकाने ग्रामीण ठाण्याचे प्रमुख एपीआय मारोती मुंडे यांना माहिती दिली. मुंडे यांनी  जल्दगतीने पोलिसांचे एक पथक धर्मापुरीकडे पाठवले आणि  एजाजला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा