Subscribe Us

header ads

सुभाष रोड परिसरात भावानेच बहिणीवर चाकूने केला हल्ला बहिणीचा उद्या होता लग्न,

बीड स्पीड न्यूज 

सुभाष रोड परिसरात भावानेच बहिणीवर चाकूने केला   हल्ला बहिणीचा उद्या होता लग्न,


बीड_ कुटुंबीयांच्या संमतीने होऊ घातलेल्या आंतरजातीय विवाहाच्या पूर्वसंध्येला सख्ख्या बहिणीसह नियोजित वरावर भावाने चाकूने हल्ला केला. सुभाषरोड या ठिकाणी भररस्त्यात २७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली.पोलिसांच्या माहितीनुसार, धनंजय दीपक बनसोडे (रा. शाहूनगर, बीड) असे हल्लेखोराचे नाव आहे. तो फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. त्याची बहीण रुपाली (२५) हिचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, पूर्वी पतीचे  निधन झाले. तिला एक मुलगा आहे. योगेश विनायक बागडे (२९, रा. धोंडीपुरा, सराफा लाईन, बीड) याच्याशी रुपाली २८ फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह होणार होता. योगेशचेही यापूर्वी लग्न झालेले असून पहिल्या पत्नीशी रीतसर फारकत घेतलेली आहे. या विवाहास दोन्हीकडून संमती होती. मात्र, रुपालीच्या भावाचा विरोध होता.दरम्यान, विवाहानिमित्त रुपाली व योगेश हे  सुभाष रोड या ठिकाणी खरेदी करत होते. ते सारडा संकुलाजवळ आले. यावेळी रुपालीचा भाऊ धनंजय बनसोडे हा तेथे आला. त्याने दोघांवर चाकूने सपासप वार केले. दोघांनी आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. त्यानंतर धनंजयने तेथून पोबारा केला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सहायक निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदार महेश जोगदंड, अविनाश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लग्नाला विरोध असल्याने भावाने दोघांवर हल्ला केला. आरोपीचा शोध सुरु आहे. जबाब नोंदविल्यावर गुन्हा नोंद करुन पुढील कार्यवाही केली जाईल. - रवी सानप, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा