Subscribe Us

header ads

जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू; तर आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड स्पीड न्यूज 


जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू; तर आईची मृत्यूशी झुंज सुरू


अंबाजोगाई_ अंबाजोगाई तालुक्यातील वागझरी गावात रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याने 3 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. साधना धारासुरे वय 6 वर्ष, श्रावणी धारासुरे वय 4 वर्ष आणि मुलगा नारायण वय 8 महिने असं विषबाधेने मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर भाग्यश्री धारासुरे (वय 28 वर्ष) असे त्यांच्या आईचे नाव आहे. भाग्यश्री यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
वागझरी येथील काशिनाथ धारासुरे यांनी आपल्या कुटुंबासह काल रात्री घरी जेवण केले होते. त्यानंतर सकाळी साधना, श्रावणी आणि आठ महिन्याच्या नारायण यांना त्रास होऊ लागला. त्यासोबत पत्नी भाग्यश्रीची देखील तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला.मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून तिन्ही बालकांनी आणि कुटुंबीयांनी रात्री जे जेवण घेतले होते, त्याचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.


शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार 


अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील रहिवासी काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील तीन बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (26 फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली.शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आ. संजय दौंड यांनी स्वाराती रुग्णालयात भेट दिली.एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा