Subscribe Us

header ads

आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू  हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड_ रजिस्ट्री कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोळीबार झालेल्या प्रकरणात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राजकारण व क्षीरसागरांतील भाऊबंदकी शिगेला पोहोचली आहे.माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता. २५ फेब्रुवारी रोजी खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधु सतीश पवार रजिस्ट्री कार्यालयात आले होते. यावेळी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण व इतरांनी रजिस्ट्री का करतो असे म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी साडेपाच लाख रुपयांची पैशांची बॅग हिसकावली. यावरून दरोडा, प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा