Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथील हनुमान मंदिर जवळील मुख्य नालीचे काम पूर्णपणे बोगस; पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या नालीवरचे स्लॅप टुटले

बीड स्पीड न्यूज 


कुक्कडगाव येथील हनुमान मंदिर जवळील मुख्य नालीचे 
काम पूर्णपणे बोगस; पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या नालीवरचे स्लॅप टुटले 

वाकनाथपुर प्रतिनिधी_ग्रुप ग्रामपंचायत कुक्कडगाव माननीय ग्रामसेवक सरपंच साहेब यांनी गावातील हनुमान मंदिर जवळील मुख्य नाली गेले पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बांधण्यात आली होती. त्या नाली चे काम पूर्णपणे बोगस झाल्याने काही दिवसातच नालीवरचे स्लॅप टुटले आहे. नालिवरचे स्लॅप टुटल्याने नागरिकांना येण्या जाण्या साठी मोठी कसरत करावी लागत आहे. तरी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी या नालीचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी गावातील अमोल भारत नवले सह गावकऱ्यांनी केली आहे. तसेच गावातील विद्युत खांबावरील लाईट बंद आहेत. त्या लाईट दुरुस्त कराव्यात आणि गावातील पाणीपुरवठा विहीरी वरील मोटार बंद आहे. ती ही लवकर दुरुस्त करावी तसेच गावातील हनुमान मंदीर परिसरातील लाईट  देखील बंद आहे. तरी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गावातील सुविधा गावातील नागरिकांना द्याव्यात अशी मागणी गावचा एक नागरिक म्हणुन अमोल नवले यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा