Subscribe Us

header ads

वयचोरी प्रकरणात अडकला वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर

बीड स्पीड न्यूज 



वयचोरी प्रकरणात अडकला वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर

टीम इंडियाला नुकताच अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा मराठी खेळाडू वयचोरी प्रकरणात अडकला आहे. वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय कमी केल्याचा गंभीर आरोप झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंगरगेकरचे खरे वय २१ वर्षे आहे आणि तरीही तो अंडर-१९ वर्ल्डकप खेळला. या स्पर्धेत त्याने त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती.टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून वर्ल्डकप जिंकला. हंगरगेकरवर वय लपवल्याचा गंभीर आरोप क्रीडा व युवक विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे. या आयएएस अधिकाऱ्याने बीसीसीआयला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी हंगरगेकर याच्याविरोधात पुरावेही पाठवले आहेत.ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार राज्यवर्धन हा धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार, इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची हंगरगेकरची जन्मतारीख १० जानेवारी २००१ होती. मात्र, आठवीच्या वर्गात नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनौपचारिकपणे राज्यवर्धनची जन्मतारीख बदलून १० नोव्हेंबर २००२ केली. म्हणजेच १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी राज्यवर्धन हंगरगेकरचे वय २१ वर्षे होते.बीसीसीआयच्या तपासात हंगरगेकर दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. असे झाले तर हा हंगरगेकरसाठी मोठा धक्का असेल. एवढेच नाही, तर या खेळाडूचा आयपीएल करारही रद्द होऊ शकतो.आयपीएल २०२२च्या लिलावातही हंगरगेकरला मोठी रक्कम मिळाली आहे. हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही बोली लावली पण शेवटी चेन्नईने बाजी मारली. मात्र, आता या वादानंतर हंगरगेकरचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा