Subscribe Us

header ads

खासदार असदुद्दीन ओवेसी यांना झेड सुरक्षा दया.....सुरेश पाटोळे.

बीड स्पीड न्यूज 


खासदार असदुद्दीन ओवेसी यांना झेड सुरक्षा दया.....सुरेश पाटोळे.

बीड (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशात एआयएमआयएम चे अध्यक्ष तथा खासदार बॅ.असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिव संघर्ष ग्रुप च्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध केला.  या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या व कारसह ताफ्यावर गोळीबार करणाऱ्या   दोषी व्यक्तीविरोधात कारवाई करून खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केंद्र सरकारला केली आहे.सध्या उत्तर प्रदेशासह पाच राज्यात निवडणुका सुरू असुन या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे उत्तरप्रदेशातील उमेदवाराच्या प्रचारासाठी एआयएमआयएमचे प्रमुख तथा खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी हे प्रचारासाठी गेले असतांना.  वापस परतातांना त्यांच्या गाडीवरती अज्ञात माथेफिरूनी गोळीबार केला आहे. भाजप सरकारच्या काळात पुरोगामी विचारसरणीशी निगडीत असलेल्या नेत्यावरती हल्ल्याचे प्रमाण वाढले असुन खा,ओवेसी यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निदंणीय असुन सदरील हल्ल्याची चौकशी करून यातील खरा मास्टर माईंड कोण आहे तो पोलीस प्रशासनाने बाहेर काढावा व आरोपीला कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा