Subscribe Us

header ads

दुचाकीला अज्ञात वाहनाची जोराची धडक तरुण ठार

बीड स्पीड न्यूज 

दुचाकीला अज्ञात वाहनाची जोराची धडक तरुण ठार

गेवराई_गेवराई येथील जुन्या बसस्थानकासमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातातमध्ये तरुण ठार झाल्याची घटना दि.21 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.अविनाश उर्फ बदाम गंगाधर जोधळे (19, रा. ताकडगाव, ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. अविनाश हा रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून जात होता. तो शहरातील जुन्या बसस्थानकासमोर आला असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोराची धडक दिली. यामधे अविनाश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर नागरीकांनी धाव घेवून जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथे हालवण्यात आले. परंतु बीडला जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा