Subscribe Us

header ads

बीड शहरासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आ.क्षीरसागरांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार; नाली बांधकाम व रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रूपयांचा निधी

बीड स्पीड न्यूज 


बीड शहरासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आ.क्षीरसागरांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार

नाली बांधकाम व रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रूपयांचा निधी

बीड (प्रतिनिधी):- शहरातील बायपास टू बायपास रस्त्याचे काम सुरु आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली,ड्रेनेज व विद्युत खाबांचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे परंतु याकरिता कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती.याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे काकू-नाना हॉस्पिटल ते सोमेश्वर मंदीर रस्त्याच्या नाली बांधकाम,ड्रेनेज व विद्युत खांबांच्या स्थलांतरण कामासाठी पाठपुरावा करत उपयुक्त निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या कामासाठी विशेष बाब या सदराखाली 10 कोटी रूपये निधी मंजूर करून बीड जिल्हाधिकारी यांना निधी वर्ग करण्याचे निर्देश दिले असून याबद्दल बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत. बीड शहरातून जाणार्‍या बायपास टू बायपास,एकूण 12 किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर असून  सध्या या रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरीही दिलेली आहे. शहराच्या दोन्ही बाजूस म्हणजेच,बार्शी रोडपासून धुळे-सोलापूर हायवे बायपास (समनापूर) 4 किलोमीटर व जालना रोडपासून धुळे-सोलापूर हायवे बायपास  (जिरेवाडी) 4 किलोमीटर शहरात दोन्ही बाजूंनी प्रवेश करताना एकूण 8 किमी डांबरी रस्ता व शहरातील काकू-नाना हॉस्पिटल ते सोमेश्वर मंदिर 4 किलोमीटर सिमेंट रस्ता मंजूर असून या रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या रस्त्याच्या बाजुला नाली बांधकाम,ड्रेनेज विद्युत खांबांचे स्थलांतरण यांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तरतूद करण्यात आली नव्हती. पावसाळ्यात रस्त्यात ड्रेनेज नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर साठून रस्त्याला नदीचे स्वरूप येत होते. यामुळे व्यापार्‍यांसह नागरिकांचे हाल होत होते. दोन्ही बाजूंच्या रस्त्यात ड्रेनेज असणे आवश्यक आहे.रस्त्यात येणारे विद्युत खांब काढून दुसऱ्या ठिकाणी बसविण्याची गरज आहे.या बाबी लक्षात घेत बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी दि.21 जानेवारी 2022 रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करत बायपास - बार्शी नाका चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - जालना रोड मार्गे बायपास राष्ट्रीय महामार्गाचे काम जे सध्या सुरू आहे.मात्र या कामामध्ये विद्युत खांबाचे स्थलांतर व ड्रेनेज साठी तरतूद नसल्याने रस्त्यावरील विद्युत खांब व ड्रेनेज यांचा मुलभूत प्रश्न मार्गी लागलेला नाही.त्यामुळे काकू-नाना हॉस्पिटल ते सोमेश्वर मंदीर रस्त्याच्या नाली बांधकाम,ड्रेनेज, विद्युत खांब स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी  निधी मंजुर करावा अशी मागणी केली होती. ही मागणी अजितदादा पवार यांनी बैठकीतच मान्य केली होती.याअनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 10 कोटी रूपयांचा निधी याकामासाठी  वर्ग करण्यात यावा असा निर्देश दि.22 मार्च 2022 रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना दिला आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून नागरिकांचा व व्यापार्‍यांचा मुलभूत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार मानुन निधी प्रत्यक्ष उपलब्ध होताच या कामाला लवकरात लवकर सुरूवात करू असे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा