Subscribe Us

header ads

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी गुत्तेदार आणि लोकप्रतिनिधीनां लाटू देणार नाही--नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी गुत्तेदार आणि लोकप्रतिनिधीनां लाटू देणार नाही--नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 30 मार्च अखंड देशाचे उधारकर्ते परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या सर्वांगिन प्रगती साठी संविधानात सविधानात्मक तरतूद केली आहे. त्याच आधारे मागासवर्गीयांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विकासात्मक धोरण राबविण्यासाठी बांधील आहे. म्हणूनच राज्य सरकार मार्फत मागासवर्गीयांच्या वस्त्यात विकास कामे करता यावेत यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत लोकसंख्येनुसार भरीव असा निधी प्रत्येक स्वराज्य संस्थेस दिला जातो परंतु या आमच्या मागासवर्गीयांच्या विकासासाठी आलेल्या निधीवर अनेक गुत्तेदारासह प्रस्थापित लोकप्रतिनिधीचां डोळा असतो निधी आमचा आणी मज्जा प्रस्थापितांनी मारायची हे आता आम्ही चालू देणार नाही पिढ्या न पिढ्या आमच्या वाटेला संघर्ष केल्या शिवाय काहीच मिळत नाही किमान जे आमचं आहे. ते आता आम्ही इतरांना देणार नाहीत या वर्षी देखील बीड शहरा साठी आठ कोटी वीस लाख रु चा निधी उपलब्ध झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित योजनेसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून अनेक गुत्तेदार सह मोठ मोठे प्रस्थापित लोकप्रतिनिधी हा निधी लाटण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु आपण हा निधी कुणाला ही लाटू देणार नाही मागासवर्गीय वस्त्यातील प्रत्येक भागात हा निधी खर्च केला जावा तसेच मंजूर कामे दर्जेदार पणे करून घेण्यासाठी आपण आता प्रयत्नशील असल्याचे भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. तर या बाबत मा जिल्हाधिकारी तसेच मा विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन देण्यात येणार असून संबंधित योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ही या प्रसंगी पत्रकातून अँड विकास जोगदंड सह अशोक कांबळे, मंगेश जोगदंड, महादेव वंजारे, सचिन जाधव, गोरख जोगदंड, राजेशभाई कोकाटे, यांनी नमूद केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा