Subscribe Us

header ads

अंबाजोगाईत आयपीएल सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा ;चार सट्टेबाज ताब्यात १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाईत आयपीएल सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा ;
चार सट्टेबाज ताब्यात १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई-: अंबाजोगाईत मंगळवारी (दि. २९) शहर पोलिसांनी बलुत्याचा मळा भागात सुरु असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा मारून चार सट्टेबाजांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.बलुत्याचा मळ्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सदरील ठिकाणी छाप मारला. यावेळी सतीश नागनाथ गंजेवार, दत्ता गोविंदराव साखरे, अनंत जगन्नाथ कदम (सर्व रा. अंबाजोगाई) आणि बालाजी पाटील (रा. लातूर) हे चौघे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद या सामन्यावर मोबाईलवरून सट्टा खेळताना आणि खेळवत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पो. ना. गोविंद येलमाटे यांचं फिर्यादीवरून चौघांवर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपाळ सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी गोविंद येलमाटे, नागरगोजे, शेख यांनी पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा