Subscribe Us

header ads

प्रहार चे पिण्याच्या पाण्यासाठी नगर परिषद कार्यालय समोर मटका फोडो आंदोलन

बीड स्पीड न्यूज 

प्रहार चे पिण्याच्या पाण्यासाठी नगर परिषद कार्यालय समोर  मटका फोडो आंदोलन

माजलगाव प्रतिनिधी-:माजलगांव शहरामधील जुजगर गल्ली येथील रहिवासी यांना नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे या अगोदर येथील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा सांगुन देखील आज करतो उद्या करतो असे म्हणुन वेळ मारून नेली त्यामुळे निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात संतप्त रहिवाशी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपरीषदेवर जुजगर गल्ली मधिल महिलांना सोबत घेऊन भव्य दिव्य हलगी टाळ वाजवीत  मोर्चा काढण्यात आला त्यानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर मठका फोडुन निषेध करण्यात आला या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष मानिक दळवे व mim पक्षाचे शहराध्यक्ष रशिद शेख यांनी उपस्थित राहुन  पाठिंबा दिला.यावेळी प्रहार चे तालुकाप्रमुख गोपाळ पैंजणे, नितीन कांबळे, भारत डोंगरे, प्रहार तालुकाप्रमुख संकेत लंगडे वडवणी, भागवत डोईजड, अविनाश ढगे, शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, अनिल देशमुख, अशोक अर्जुन, दिनकर बादाडे, विकास जगताप मयुर शर्मा, महादेव डाके, काशिनाथ कुचेकर, सुनिल पवार, प्रकाश चोरमले अंबादास ढवळे, विमल जाधव स्मिता सुपेकर, शारदा सुपेकर, मनिषा उमरे, अनेक महीला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा