Subscribe Us

header ads

स्त्रीशक्ती फांऊडेशनचे उद् घाटन व वक्तृत्व स्पर्धा विजेता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 

स्त्रीशक्ती फांऊडेशनचे उद् घाटन  व वक्तृत्व स्पर्धा विजेता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

पुणे-:महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या "स्त्रीशक्ती फांऊडेशन"चे उद्घाटन  व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विजेता सन्मान सोहळा विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उत्साहात संपन्न.पिंपरी चिंचवड मधील शिवाजी पार्क भागातील कम्युनिटी हाॕल येथे "स्त्रीशक्ती फांऊडेशन"उद् घाटन सोहळा तसेच अध्यात्मिक गजानन ग्रुप अंतर्गत बालसंस्कार वर्ग च्या वतीने आणि नागपुरच्या रुग्वेद न्युज चॕनेलच्या सौजन्याने 

आॕनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचा विजेता सन्मान या सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. योगगुरु सौ.अर्चना सोनार यांनी विविध माध्यमातुन केलेल्या सामाजिक कार्याच्या आढाव्यानुसार सत्य घटनेवर आधारीत  "स्त्रीशक्ती"या शिर्षकानुसार छोटीसी नाटिका संपर्कातील महिलांनी उत्कृष्टरित्या  सादर केली.यानंतर "स्त्रीशक्ती फांऊडेशन"चे उद् घाटन ज्येष्ठ समाजसेविका उर्मिलाताई पिंगळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन रुग्वेद न्युज चॕनेलचे संचालक दिनेश येवले,मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे , डाॕ.ईश्वर सोनार,गौरव सोनार,समाजसेविका ज्योतीताई खेडकर यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात 

प्रामुख्याने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यामध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन - सौ.दर्शनाताई शेटे,स्वच्छता अभियान-सौ.मीनाताई औटी ,विविध स्पर्धेतील -खुप छान फिल्डींग -सौ.मीनाजंली मोहिते व अंजली कांदेकर,तीन पायाची शर्यत -सौ.शितल अग्रवाल ,धावणे स्पर्धेत-सौ.सारिकाताई देशमुख ,चमचा लिंबु -माधुरी कुराहडे,दोरीवरच्या उड्या - सौ.छंदीता मंडल आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमात ज्या महिला या गार्डनमध्ये कर्मचारी म्हणुन काम करतात.व त्यांचे नेहमी सहकार्य असते .अशा केराबाई शिंदे,संगीता ठोंबरे, पुष्पाबाई गुप्तर यांचाही सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी विविध गींतावर रंगारंग मनमोहक नृत्य सादर 

केले.त्यामध्ये सौ.अर्चना सोनार,सौ.करुणा मिस्त्री,सौ.दर्शना शेट्टे,सौ.सुप्रिया देसाई,सौ.छंदिता मंडल आदी महिलांचा समावेश होता.राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विजेता सन्मान सोहळ्यात प्रथम -नारायणी विसपुते,द्वितीय - रोहन पडवेकर,तृतीय-कु.स्वरा शहाणे व उत्तेजनार्थ-मृणाल सोनार यांचा समावेश होता.त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस धुळे येथील एका कार्यक्रमात देण्यात आले.उर्वरीत क्रमांकाचे बक्षीस या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या संपुर्ण सोहळ्याचे सुत्रसंचलन सौ.रेखा महिंद्रकर,सौ.नीता बागडे,सौ.कल्पना पाटील यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या सांभाळले. तर सोहळा यशस्वीतेसाठी सौ.रत्नाबाई कोणते,सौ.मीनाताई शेवाळे, सौ.आशा हेगडे,सौ.साक्षी सालकर व सर्व महिलांचा मोलाचा सहभाग  होता.शेवटी आभार प्रदर्शन सौ.मीनाजंली मोहिते यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा