Subscribe Us

header ads

श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूरचा उपक्रम....सुवर्णकार समाजातील मान्यवरांचा व पत्रकार बांधवाचा पुण्यात सत्कार

बीड स्पीड न्यूज 


श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूरचा उपक्रम....
सुवर्णकार समाजातील मान्यवरांचा व पत्रकार बांधवाचा  पुण्यात सत्कार 

वटवृक्ष व तुळशीचे रोप वाटप करून पर्यावरण बचावचा संदेश.......

शेगाव-: श्री द्वारकाधिश प्रतिष्ठान (नागपूर) तर्फे सुवर्णकार समाजातील समाजसेवक व पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ श्री संत नरहरी महाराज मंदिर तुकाई नगर , हडपसर, पुणे येथे दि.२७/३/२२ रोजी (रविवार) आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार  अर्पण करून झाली. यावेळी महाआरती करण्यात आली.  प्रास्ताविकात अनिल उंबरकर (शेगाव) यांनी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमाची माहीती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.एकनाथ शंकरराव तथा काकासाहेब डहाळे(अध्यक्ष, समस्त लाड सुवर्णकार सेवा मंडळ हडपसर) होते. श्री व्दाकाधीश प्रतिष्ठान (नागपूर)च्या अध्यक्षा सौ. अंजलीताई द्वार सुरेशराव अनासाने (श्रीमद भागवत प्रवचनकार तसेच राष्ट्रीय महिला संत), सचिव विलासराव अनासाने,व इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गजाननराव शेरेकर (उद्योजक) पुणे, मा.मीनाक्षीताई उंबरकर (राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या)
मा.ज्ञानेश्वर मुंडलिक (पुणे)
मा.सुनिलजी वेदपाठक (पुणे)
मा. सुनिल हिरूळकर
मा.किशोरजी मांडळे (पुणे )
मा. जयप्रकाशजी बेद्रे, (उरुळी कांचन, खजिनदार काँग्रेस पक्ष) उपस्थित होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भालचंद्रजी टेंभुर्णीकर (पुणे)प्रभाकररावजी गळंगे (पुणे),
पोपटराव कुलथे बारामती,स्व रमेशजी दुसाने (पुणे), विजयजी काजळे आदी जेष्ठ मान्यवरांचा सत्कार केला.तर सन्माननिय पत्रकार कमलाकर कुलथे (बीड),चंद्रकांत आंबिलवादे (पैठण),प्रकाश बागडे (शेवगाव), स्वप्निल  सोनार (श्रीरामपूर),बालाजी सुवर्णकार (उदगीर),स्वामीराज कुलथे (श्रीरामपूर ),महेश माळवे,नितिन चित्ते  ,सुनिल मालेगावकर,
श्रीधर ढगे आँनधिस टाईम मिडिया गृप आदीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार म्हणून शाल,श्रीफळ व सन्मानपत्र तसेच  गौरविण्यात आले. यासोबत भेट म्हणून "तुळशी" आणि "वडाचे रोपटे"मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले. हिंदू संस्कृतीत तुळशीला कृष्ण भक्ति म्हणून कलयुगाचे जगत् गुरु म्हणून संबोधले जाते तर वडाचे झाडाचा वटवृक्षाप्रमाणे विस्तार व्होऊन समाजाची सेवा व्हावी तसेच वडाचे झाड जसे शंभरहून अधिक वर्षे जगते तसे व्दारकाधिश प्रतिष्ठान हे सर्वसमाज बांधवाच्या सहकार्याने वाढावे हा व्दारकाधिश प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.अंजलीताई अनासने यांनी उपस्थित कार्यक्रमात सर्वशाखिय सुवर्णकार समाजासाठी संबोधित केले. तुळशी आणि वडाचे झाड निसर्गाच्या सानिध्यात लावून पर्यावरण च्या द्दष्टीने चांगले आहे यासाठी ही भेट म्हणून दिलेली प्रत्येकाने आपल्या परिसरात लावावे, असे यावेळी आवाहन केले. सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची मुद्रा/नाणे शासनाने दखल घेऊन प्रकाशित करावी यासाठी श्री व्दारकाधिश प्रतिष्ठान (नागपूर)सोबत आपणही शासनाकडे पाठपुरावा करावा असे कळकळीचे आवाहन उपस्थित सुवर्णकार समाज बांधवाना  केले.या कार्यक्रमात श्रीधर ढगे संपादक "ऑन धिस टाईम" डिजीटल मिडीया गृप यांनी ही उपस्थिती लावली होती.
तसेच श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान (नागपूर) च्या  राज्य कार्यकारी अध्यक्ष पदी सौ. मनिषाताई विलासराव अनासाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सुवर्णकार समाजातील पुणे तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व  शाखिय सुवर्णकार समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन  मिलिंद दुसाने (पुणे) यांनी केले तर आयोजक सुरेशराव अनासाने (उपाध्यक्ष) विलासराव अनासाने (सचिव)अनंतराव उंबरकर (सहसचिव)अनिल उंबरकर प्रचार प्रमुख व समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान (नागपूर)
आत्माराम ढेकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा