Subscribe Us

header ads

मराठी राज्य नाट्य स्पर्धेत वास्तव या नाटकाने व्यवस्थेवर प्रकाश टाकला; आज होणार चरक नाटकाचे सादरीकरण


बीड स्पीड न्यूज 

मराठी राज्य नाट्य स्पर्धेत वास्तव या नाटकाने व्यवस्थेवर प्रकाश टाकला; आज होणार चरक नाटकाचे सादरीकरण


बीड / प्रतिनिधी_महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन गुरुवार दि. १० मार्च ते रविवार दि.२० मार्च या कालावधीत बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोज सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ११ नाट्यसंस्था सहभागी झालेल्या आहेत. गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या नाट्य स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद दिसून शनिवारी सादर झालेल्या वास्तव  या नाटकाने समाज व्यवस्थेवर प्रखडतेने प्रकाश टाकला. कोरोना काळ आणि जात व्यवस्था हा विषय घेऊन सादर झालेले वास्तव हे नाटक रसिकांना चिंतन करण्यास भाग पडणारे होते.  दरम्यान रसिकांनी नाटकांचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य  संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहेत. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव 

मिळावा. त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडून आणावा. नाट्यकलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून करावा. सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली 59 वर्षापासून करत आला आहे. यावर्षी 60 व्या वर्षात राज्यनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. आपण या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता व कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी केले आहे. दरम्यान मराठी नाट्य स्पर्धेच्या तिसऱ्या  दिवशी वास्तव हे नाटक सादर झाले. दासोपंत संशोधन मंडळ अंबाजोगाई  यांनी सादर केलेल्यावास्तव  या नाटकाने रसिकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखक व  दिगदर्शक  गिरीश बाळासाहेब बिडवे यांनी उत्तम प्रकारे दिगदर्शन करून नाटकाची उंची अजून वाढविली आहे. एकंदरीत वास्तव  हे नाटक रसिकांच्या मनात घर करून गेले.



एकापेक्षा एक सरस विषय

आज सोमवार दि. १४ मार्च रोजी चरक, मंगळवार दि.१५ मार्च रोजी अजून ही  उजाडत नाही, बुधवार दि.१६ मार्च रोजी भेट, गुरुवार दि.१७ मार्च रोजी श्त्री सन्मानार्थं, मातृ धर्म सन्मानार्थ, शुक्रवार दि.१८ मार्च रोजी ११ महिने १४ दिवस, शनिवार दि. १९ मार्च रोजी उचल, रविवार दि.२० मार्च रोजी कस्तुरी ही नाटके सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा