Subscribe Us

header ads

बीड येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कार्यालयातील लिपिक वर्षानुवर्षे ठाण मांडून


बीड स्पीड न्यूज 


बीड येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कार्यालयातील लिपिक वर्षानुवर्षे ठाण मांडून

इंजि.सादेक इनामदार यांची उत्पादन शुल्कच्या राज्य आयुक्तांकडे तक्रार

बीड/धारूर_ दि.१२ : बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात दोन लिपिक वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्यांची परजिल्ह्यात बदली करावी. तसेच, त्यांनी केलेल्या ‛कारनाम्यां’ची चौकशी करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि.सादेक इनामदार यांनी उत्पादन शुल्कचे राज्य आयुक्त यांच्याकडे दि.१० मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक बी.एल. गाडे, श्रीमती. तिडके हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत आहे. शासन नियमानुसार ५ वर्षात एकाच कार्यालयात काम केल्यानंतर इतर ठिकाणी बदली होणे अपेक्षित आहे. परंतु, दोघेही ७ वर्षांपासून याच कार्यालयात कार्यरत आहेत. ते बीड येथे रूजू झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत एफएल ३, एफएल २, सीएल ३ अशी नवीन लायसन्स काढणे, परवाना नुतनीकरण करणे व इतर जे आवश्यक असणारी राज्य उत्पादन विभागाची कामे आहेत, त्यासाठी परवानाधारकांकडून पैसे घेतात. काही परवानाधारकांचे जाणीवपूर्वक प्रकरणे निकाली काढत नाहीत. तसेच जिल्ह्यातील परवानाधारकांकडून पैशाची मागणी करतात. अशा माध्यमातून अवैध संपत्ती गोळा केलेली आहे. त्यांना नौकरी लागण्यापूर्वी किती संपत्ती होती व नौकरी लागल्यानंतर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याची सखोल चौकशी एक समिती नियुक्त करावी. अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि. सादेक बाबामियाँ इनामदार यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.


बदलीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन

बीड जिल्ह्यात बदली संदर्भातील कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येते. एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून बसलेले असतात. अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना राजकीय वरदहस्त असतो, हे सर्वश्रुत होत आहे. तरी देखील कारवाया होताना दिसून येत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा