Subscribe Us

header ads

वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रस्त्याचे काम तीन वर्षापासून बंद

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रस्त्याचे काम तीन वर्षापासून बंद



वाकनाथपुर प्रतिनिधी-: ग्रामीण भागातील विकास कामे मंजुर होऊन देखील कामे पुर्ण होत नाहीत.कामे का बंद आहेत या कडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाही.बीड पासुन १५ किमी अंतरावर असणारे वाकनाथपुर हे गाव 

या गावाचा विकास काही केल्या होत नाही. या गावात जाण्यासाठी कोणत्याही बाजूने डांबरी रस्ता नाही गावाला तीन बाजूने नद्या आहे. परंतु ऐकाही नदिवरती पुल झालेला नाही. आता काही वर्षा पूर्वी वाकनाथपुर ते 

म्हाळस जवळा या गावाला जोडला जाणारा डांबरी रस्ता मंजुर झाला या रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली पण खडी आणि मुरूम टाकून या रस्त्याचे काम कोरोना काळात बंद केले. ते काम अद्याप ही चालु करण्यात आले 

नाही. जागोजागी या रोडवरील खडी वरती आली असुन खडी वरती आल्याने नागरिकांचे खुप हाल होत आहेत. जर का थोडा पाऊस पडला तर या गावातून बाहेर ही निघता येत नाही तरी वरिष्ठ अधिकारी यांनी काम बंद का आहे. याची चौकशी करून पाऊस पडण्या अगोदर लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा