Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील दहा फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती

बीड स्पीड न्यूज 



बीड जिल्ह्यातील दहा फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती

बीड-: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आज मंगळवारी (दि. २२) राज्यातील ८४६ पोलीस उपनिरिक्षकांच्या पदोन्नतीची यादी जाहीर केली. या सर्व ८४६ पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सध्या कर्तव्यावर असलेल्या दहा पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यात रुजू असलेले दत्तात्रय गंगाधर मंठाळे, ज्ञानदेव प्रल्हाद सानप, सुभाष गोकुळ माने, जयसिंग मदनसिंग परदेशी, गंगाधर शेषेराव दराडे, दादासाहेब विजयकुमार सिद्धे, विठ्ठल त्रिंबक वारे, अर्जुन वामन चौधर, संतोष बाळासाहेब जोंधळे, आणि मनोजकुमार श्रीरंग लोंढे या दहा पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी बढती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा