Subscribe Us

header ads

संतापजनक! आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

बीड स्पीड न्यूज 
     

 संतापजनक! आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

अंबाजोगाई_अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे एका आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डोंगरपिंपळा येथील एक आठ वर्षीय चिमुरडी शनिवारी दुपारी तीन च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना तिच्या शेजारी राहत असलेल्या आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर(वय२३वर्षे) याने आपल्या घरात बोलवून बळजबरीने तोंड दाबत बलात्कार केला. दरम्यान पीडितेने हा घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात ३७६, ३७६ (२), ३७६ (ab) ५०४, ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा