Subscribe Us

header ads

केरोसीन हॉकर्स च्या न्यायालयीन लढ्याला यशनगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकर्स ला न्याय मिळाला

बीड स्पीड न्यूज 


केरोसीन हॉकर्स च्या न्यायालयीन लढ्याला यश
नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकर्स ला न्याय मिळाला

बीड (प्रतिनिधी) केंद्रात आणि राज्यात तत्कालीन भाजपा सरकार आले आणि सुरवातीला निवडक काही राज्यात केरोसीन मुक्त जिल्हा आणि नंतर राज्य देखील मुक्त करण्यात आले महाराष्ट्र राज्यात ही 2019 ला केरोसीन नियतन स्थगीत करण्यात आले यामुळे राज्यातील सुमारे सात हजार केरोसीन परवानाधारक  हॉकर्स वर उपासमारीची वेळ आली हा एक प्रकारे केरोसीन हॉकर्स तसेच घाऊक अर्धघाऊक विक्रेत्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात आल्याने या अन्याच्या विरोधात संबंध मराठावाढ्यात भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी हॉकर्स ची मोठ बांधत लोकशाही मार्गने महाराष्ट्र राज्या चे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र जी फडवणीस व अन्न व पुरवठा मंत्री यांचे कडे निवेदन देऊन हॉकर्स च्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या मा जिल्हाधिकारी बीड तसेच मा आयुक्त यांचे कडे देखील निवेदन देऊन हॉकर्स वर झालेला अन्याय व्यक्त केला वारंवार लोकशाही मार्गने निदर्शने आंदोलन केले परंतु इथल्या तत्कालीन व विद्यमान सरकारकडून केरोसीन हॉकर्स च्या मागण्या संदर्भात कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने शेवटी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी कायदे तज्ञ विधीज्ञ अँड अमोल गायकवाड, व अँड विजय शिंदे यांचे मार्फत उच्च न्यायाल्यात याचिका दाखल केली. सदरील प्रकरनाची सुनावणी मा न्यायधीश साधना जाधव व मा न्यायधीश डिगे यांचे खंडपिठात झाली न्यायालयात अँड अमोल गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडल्याने मा न्यायाल्याने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढत बारा आठवढ्यात केरोसीन हॉकर्स च्या मागण्यांचा योग्य विचार करून पर्यायी निर्णय घेऊन तसे न्यायालयास कळविण्यात यावे असा आदेश दिनांक 21 मार्च 2022 रोजी पारीत केला असून भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकर्सच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळाले असल्याने हॉकर्स बांधवातुन आनंद व्यक्त होत आहे.


         
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक संविधानामुळेच हॉकर्स ला न्याय मिळाला 

आपल्या देशाला भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विश्वश्रेष्ठ संविधानामुळेच प्रत्येक नागरिकांना समान अधिकार मिळाले आहेत आपल्या देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे.म्हणून च आम्हाला न्याय मिळाला आहे.औरंगाबाद उच्च न्यायलय येथील विधितज्ञ अँड अमोलजी गायकवाड व बीड येथील विधितज्ञ अँड विजय शिंदे यांनी अभ्यासपूर्ण बाजू मांडली त्यांचे अभिनंदन व बीड जिल्ह्यातील समस्त हॉकर्स बांधवांच्या वतीने आभार तसेच या संपूर्ण लढ्यात आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटनेचे राज्यध्यक्ष अशोक कांबळे,अंबेजोगाईचे शेख हफिज भाई,माजलगांवचे जाफर भाई, शेख रोफ, बाळासाहेब धारक,मंगेश जोगदंड,सचिन जाधव, महादेव वंजारे व संबंध बीड जिल्ह्यातील, मराठावाडयातील हॉकर्स बांधवांचे आभार 

 अँड विकास जोगदंड
संस्थापक/अध्यक्ष, भिम स्वराज्य सेना तथा नगरसेवक न, प बीड (याचिकाकर्ते)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा