Subscribe Us

header ads

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज शिवजयंती व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांचे व्याख्यान व मान्यवरांचा विशेष गौरव

बीड स्पीड न्यूज 


जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज शिवजयंती
व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांचे व्याख्यान व मान्यवरांचा विशेष गौरव



परळी/प्रतिनिधी_जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सोमवार दि.21 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता मोंढा मैदानावर शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद यांचे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. याच कार्यक्रमात प्रसिद्ध व्यापारी गुलाब अप्पाराव शेटे,दैनिक मराठवाडा साथी कार्यकारी संपादक  प्रशांत प्र.जोशी, प्रसिद्ध कवी प्रा.अरूण पवार यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती संस्थापक अभयकुमार ठक्कर यांच्यासह समिती सदस्यांनी दिली.
प्रतिवर्षा प्रमाणे जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिव प्रतिमेचे पूजन, भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन तसेच प्रसिद्ध शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद यांचे विशेष व्याख्यान या कार्यक्रमात होणार आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यापारी गुलाब अप्पाराव शेटे, दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत प्र.जोशी, कवी प्रा.अरूण पवार यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अभयकुमार ठक्कर, मार्गदर्शक प्राचार्य अतुल दुबे, अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा