Subscribe Us

header ads

ढेकणमोहा येथे शार्ट सर्कीट मुळे आग लागल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

ढेकणमोहा येथे शार्ट सर्कीट मुळे आग लागल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान 

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील शिवारात शार्ट सर्कीट मुळे आग लागल्याने शेतकर्‍यांचा सहा ते सात  एकर ऊस जळुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील घटना आज दि. 20 रोजी  ढेकणमोहा येथे  दुपारी चार वाजता घडली असून विजेच्या शार्ट सर्कीट मुळे आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सदरील आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. सदरील ऊस शहादेव भानुदास थापडे, गोविंद शाहदेव थापडे, बिभीषण शहादेव थापडे, हनुमंत शहादेव थापडे, गणेश एकनाथ थापडे, यांचा असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील नुकसान झालेल्या ऊसाचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा