Subscribe Us

header ads

घाऊक,अर्ध घाऊक, हॉकर्स,किरकोळ केरोसीन परवानाधारकांना आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटना व भिम स्वराज्य सेनेच्या माध्यमातून न्याय मिळाला सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 



घाऊक,अर्ध घाऊक, हॉकर्स,किरकोळ केरोसीन परवानाधारकांना आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटना व भिम स्वराज्य सेनेच्या माध्यमातून न्याय मिळाला

सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार
नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

जो पर्यंत वकीली व्यवसायात आहे तो पर्यंत हॉकर्स साठी काम करणार
अँड अमोलजी गायकवाड

केरोसीन हॉकर्स च्या न्यायालयीन लढ्याला यश
नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकर्स ला न्याय मिळाला

बीड (प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षापासुन केरोसीन नियतन स्थगीत करण्यात आल्यामुळे राज्यातील सुमारे सात हजार केरोसीन परवानाधारक हॉकर्स वर उपासमारीची वेळ आली होती. हा एक प्रकारे केरोसीन हॉकर्स तसेच घाऊक अर्धघाऊक विक्रेत्यांवर राज्य सरकारकडून अन्यायचं करण्यात आला होता अन्याच्या विरोधात संबंध मराठावाढ्यात लोकशाही मार्गने आंदोलन करण्यात आले. परंतु इथल्या निगरगठ्ठ राज्य सरकारने कसल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही शेवटी न्यायाल्याने आम्हाला न्याय दिला या पुढे प्रत्येक हॉकर्स, किरकोळ, घाऊक, अर्धघाऊक केरोसीन परवाना धारकांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी आज रोजी शासकीय विश्राम गृह येथे आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. तर कायदे तज्ञ विधीतज्ञ अँड अमोल गायकवाड, यांनी या प्रसंगी संपूर्ण न्यायलीन कामकाज सह सखोल मार्गदर्शन करत जो पर्यंत वकीली व्यवसायात आहे तो पर्यंत उपेक्षित वंचीत हॉकर्स साठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटनेच्या वतीने अँड अमोल गायकवाड व अँड विजय शिंदे यांचे आभार मानन्यात आले.तसेच भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकर्सच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळाल्याने हॉकर्स बांधवातुन समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटनेचे राज्यध्यक्ष अशोक कांबळे यांनी ही सखोल असे मार्गदर्शन केले. बैठकीस जाफर भाई, शेख रोफ, बाळासाहेब धारक,मंगेश जोगदंड,सचिन जाधव,महादेव वंजारे, सर्जेश जोगदंड,शेख खलील,बाबा काजी, बाळकृष्ण शेंडगे,दिलीप जैन,चोखोबा साळवे,बाबुराव आहिरे,राजेंद्र कांबळे,रवींद्र डोळस,सिद्धार्थ सूर्यवंशी सह हॉकर्स, किरकोळ परवाना धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन आदर्श जोगदंड यांनी केले तर आभार मंगेश जोगदंड यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा