बीड स्पीड न्यूज
हजारो मान्यवरांच्या साक्षीने सूर्यकर परिवाराचा वैदिक विवाह संपन्न; पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती
परळी प्रतिनिधी-: दैनिक दिव्यअग्नि चे संपादक प्रकाश सूर्यकर आणि राऊत परिवाराचा विवाह सोहळा रविवार दिनांक 20 मार्च रोजी बीड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो पाहुणेमंडळी नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित वैदिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला या नेत्रदीप सोहळ्यातून खरोखरच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा ऐतिहासिक विवाह सोहळा परळी शहरात संपन्न झाल्याच्या भावना सर्वांनीच व्यक्त करीत वधू-वरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.भारतीय वैदिक
संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते या संस्कृतीतून मानवी जीवन सुसंस्कृत आणि सुखमय जगण्याचा मार्ग मिळतो देव देवतांचे विवाह सोहळे (प्रभू रामचंद्र,श्रीकृष्ण आदी ) सोहळे या वैदिक पद्धतीनेच पार पाडले गेले हि वैदिक पद्धत पृथ्वीतलाच्या निमिर्तीपासूनच प्रचलित होती. अश्या आदर्श वैदिक पद्धतीनेच रविवार दि.२० मार्च रोजी दैनिक दिव्यअग्नि चे संपादक प्रकाश सूर्यकर याचे चिरंजीव पवनराज आणि राऊत परिवाराची कन्या रेणुका यांचा विविह सोहळा वैदिक पद्धतीने आचार्य नयनकुमार शाश्त्री यांच्या मंत्रोच्चारातून संपन्न झाला या विविह सोहळ्याच्या माध्यमातून अक्षदा म्हणून पुष्प वृष्टी करण्यात आली यामुळे अन्न धान्याची नासाडी झाली नाही विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांनी अश्याच विविह प्रथांना मान्यता दिल्या आहेत . हा ऐतिहासिक आणि नेत्र दिपवून सोडणाऱ्या विवाह सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती . तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला उपाध्यक्ष
सुदामती ताई गुट्टे, भाजपचे जेष्ठ नेते आणि भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, जि. प.चे गटनेते अजय मुंडे ,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे भाजपचे जेष्ठ नेते राजेश देशमुख ,परळी बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रा.विजय मुंडे , आदी राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे पधादिकारी नेते बीड ,लातूर,परभणी जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक पत्रकार,परळी शहरातील संपूर्ण संपादक व पत्रकार मंडळी, मित्र परिवार , आप्त संबंधी पाहुणे मंडळी आदी हजारोंच्या साक्षीने वैदिक पद्धतीने नेत्र दिपवून सोडणार विवाह सोहळा परळी शहरात संपन्न झाला या ऐतिहासिक सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतेले असता या सर्व मान्यवरांनी वधूवरांसह सूर्यकर-राऊत परिवाराला शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या