Subscribe Us

header ads

उपरे काका यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा ऐतिहासिक होणार- संतोष उपरे हनुमंतराव उपरे काकांचा स्मृती समारंभ; गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 

उपरे काका यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा ऐतिहासिक होणार- संतोष उपरे

हनुमंतराव उपरे काकांचा स्मृती समारंभ; गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन



बीड,(प्रतिनिधी):- ओबीसीं समाजाच्या न्याय हक्कासाठी दिवसरात्र काम करणारे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष हनुमंत काका उपरे स्मृतिदिनानिमित्त अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभ आणि इतर आयोजित कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य सल्लागार संतोष उपरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हा स्मृतिदिन समारंभ शनिवार (दि.१९) मार्च २०२२ रोजी सकाळी १०: ०० मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिशेष हनुमंतराव उपरे काका स्मृतीस्थळ,घोसापुरी बीड येथे नियोजित वेळेत होणार आहे.पत्रकात पुढे म्हणाले आहे की, स्मृतिशेष हनुमंतराव काका उपरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण, गौरव ग्रंथाचे प्रकाशन तसेच बीड शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बीड शहरातून भव्य मोटारसायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमाला भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई (अध्यक्ष, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षा भूमी नागपूर), भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, भंते धम्मशील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून राजेंद्र पाल गौतम (कॅबीनेट मंत्री,समाजकल्याण,महिला तथा बालविकस,दिल्ली सरकार), हर्षदिप कांबळे (विकास आयुक्त), न्या.सी.एल.थुल (माजी अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग), गौतमीपुत्र कांबळे (सेक्युलर मुव्हमेंट अध्यक्ष), राजेश ढाबरे(नार्कोटिक्स कमिशनर,मुंबई), सुबच्यन राम (इन्कम टॅक्स कमिशनर), शिवानंद टाकसाळे (मुख्य कार्यकारी अधिकारी,परभणी), तुषार ठोंबरे (अप्पर जिल्हाधिकारी,बीड), सुनील लांजेवार (अप्पर पोलीस अधिक्षक,बीड), संतोष वाळके (पोलीस उप अधिक्षक,बीड) प्रमुख उपस्थिती म्हणुन राजेंद्र जगताप (माजी आमदार), न्या.बी.जी.कोळसे पाटील(अध्यक्ष,लोकशासन अंदोलन पार्टी), पप्पु कागदे,( युवा प्रदेशाध्यक्ष रिपाई) सुशिलाताई मोराळे, भगवान वीर(प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण), कॅप्टन,कुणाल गायकवाड, धनाजी गुरव,प्रा.प्रदिप रोडे,उल्हास राठोड, रमेश कटके, रवींद्र कोलप(अधीक्षक अभियंता एमएसईबी), ओमप्रकाश मौर्य, डॉ.वंदना महाजन,आदींची उपस्थिती राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा