Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नातून होत आहे पाणी पुरवठा सुरळीत; 20 तारखेपासून तीन प्रभागांमध्ये नियमित पाणी पुरवठा

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नातून होत आहे पाणी पुरवठा सुरळीत; 20 तारखेपासून तीन प्रभागांमध्ये नियमित पाणी पुरवठा



बीड (प्रतिनिधी):- गेल्या पाच वर्षापासून बीड शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही. पाणी असूनही पाण्यावाचून बीडकरांचे हाल सुरू आहेत. शहराला नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व मन:पुर्वक प्रयत्न केले. यातूनच 20 एप्रिलपासून 

शहरातील दोन प्रभागांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू झाला असून उर्वरित प्रभागांमध्ये लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शनिवारी दि.30 एप्रिल रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी यासाठी सर्व आवश्यक बाबींची पाहणी 

केली.बीड शहरातील प्रभाग क्र.18,19 व 20 मध्ये गेल्या 20 तारखेपासून नियमितरित्या पाणी येत आहे. बीड शहरातील अनियमित पाण्याचा प्रश्न हा शहरवासियांसाठी जिव्हाळ्याचा ठरलेला आहे. पाणी साठा उपलब्ध असूनही यंत्रणेअभावी शहरवासियांना पाणी मिळत नाही याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी कंबर कसली होती व शर्थीचे प्रयत्न केले होते. या माध्यमातूनच वेळोवेळी 

पाठपुरावा करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत: प्रत्यक्षरित्या कामाला लागले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र असून शहरातील तीन प्रभागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरित संपुर्ण शहराचा पाणी पुरवठाही लवकरच सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची आज शनिवार दि.30 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. यातूनच शहराला लवकरात लवकर नियमितपणे पाणी मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी पाहणी करतांना आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम व पाणी पुरवठ्याचे अधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा