Subscribe Us

header ads

समाजसेवक अकरम जरगर तर्फे रमजान ईद निमित्त आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 

विशाल सराफ

समाजसेवक अकरम जरगर तर्फे रमजान ईद निमित्त  आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न



किल्ले धारूर/ प्रतिनिधी-:मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणानिमित्त येथिल समाजसेवक अकरम जरगर यांनी दि.29 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर दरवर्षी प्रमाणे गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.या पार्टीला स्थानिक मशीद आणि मदरसे यांतील मौलाना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी:-माजलगावचे मा.नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस,किल्ले धारूर चे मा नगराध्यक्ष डॉ स्वरुपसिंह हजारी,मा नगराध्यक्ष माधव तात्या निर्मळ,मा नगराध्यक्ष अर्जुन बप्पा गायकवाड,पंचायत समितीचे सभापती हनुमंत बप्पा नागरगोजे, पाटोदा नगर पंचायत चे नगरसेवक आसेफ भैय्या सौदागर,धारूर पोलीस स्टेशन चे पी आय आटोळे साहेब ,भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे मराठवाडाध्यक्ष इंजि सादेक भैय्या इनामदार, शोएब कुरेशी,माजी नगरसेवक फसी भैय्या,माजी नगरसेवक हरून सर, माजी उपाध्यक्ष आवेज कुरेशी,माजी नगरसेवक एजाज भाई,अकरम भाऊ, सय्यद रज्जाक, नदीम मोमिन,इमरान कादरी,मैनुदिन जरगर, गफ्फार जरगर, अक़ील जरगर,अफसर जरगर, दीदार जरगर, राजू जरगर, बशीर जरगर, अय्यूब जरगर,पत्रकार वर्ग व शहरातील सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा