Subscribe Us

header ads

प्रल्हाद फड यांचा वाढदिवस वह्या,पेन, फळे वाटप करून साजरा केला - भागवत वैद्य

 बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी किशोर खरात

प्रल्हाद फड यांचा वाढदिवस वह्या,पेन, फळे वाटप करून साजरा  केला - भागवत वैद्य

बीड प्रतिनिधी-: पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समितीचे प्रदेश सचिव प्रल्हाद फड यांचा आज शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी बीड येथील स्वराजनगर हनुमान मंदिर तिरुपती नगर, व वह्या, पेन, फळे  हे साहित्य जिव्हाळा निवारा केंद्र , भाजी मंडई येथे पिंपळ ,करंजी, बिल, कडीपत्ता व विविध फुलांचे  झाडे लावून साजरा केला यावेळी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आर .जी. माने ,पत्रकार भागवत वैद्य, राजू वंजारे,अभिजित वैद्य,ऋतुजा सोनवणे,सुरेखा जाधव, किशोर सोनवणे, मेजर भास्कर सांगळे आदी उपस्थित होते. अशी माहिती दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात भागवत वैद्य यांनी म्हटले आहे.सविस्तर वृत्तांत असा की, पुरोगामी पत्रकार संघ हा महाराष्ट्र मध्ये गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या समस्या बरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. काही दिवसापूर्वी अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ अशी त्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वत्र भारतभर गुजरात, आंध्र प्रदेश ,मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा या ठिकाणी त्याच्या शाखा स्थापन झालेले आहेत. सर्वत्र पसरलेला या पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समितीचे प्रदेश सचिव प्रल्हाद फड यांचा आज वाढदिवस आहे. प्रल्हाद फड हे नाव परळी तालुक्यातच नव्हे  तर आज महाराष्ट्रभर पोहोचलेल आहे. एक उद्योजक, राजकीय, सामाजिक, आर्थिक पैलू असलेलं हे व्यक्तिमत्व या व्यक्तीचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. आणि त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर ठिकठिकाणी झाडे लावून व काही ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल याचे वाटप करण्यात आला आहे. पुणे, बीड ,परळी, माजलगाव ,अंबाजोगाई, केज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात  आला आहे. अशी माहिती पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष भागवत वैद्य यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा