Subscribe Us

header ads

प्रथमच जिल्हा स्तरावर बीड शहरात महिला समता सैनिक दल स्थापन -- अमरसिंह ढाका

बीड स्पीड न्यूज 
 

प्रतिनिधी किशोर खरात


प्रथमच जिल्हा स्तरावर बीड शहरात महिला समता सैनिक  दल स्थापन  -- अमरसिंह ढाका
 
 कु. पल्लवी वाघमारे ची बीड शहर महिला समता सैनिक दल प्रमुख पदी निवड


बीड  प्रतिनिधी / दि. 30 -: माणस शास्त्रिय दृष्ट्या स्त्री-पुरुषाच्या गुणवत्तेचा शोध घेतला असता असे दिसून येते की, मुला पेक्षा कितीतरी पटीने मुलीच अधिक  चांगलेच काम करू शकतात.व त्या कामात प्रमाणिकता सुध्दा जपतात .व  सोपवलेली प्रत्येक  जबाबदारी त्या अगदी प्रामाणिकपणे पार पडतात.या सर्वोत्तम  स्त्रीत्वाचा  शोध घेतला असता बीड मध्ये महिला समता सैनिक दल का काढू नये ? ही कल्पना  अमरसिंह ढाका यांना  सुचली. तेंव्हा कु.  पल्लवी वाघमारे व कु. कोमल वाघमारे या दोन सायन्स  पदवीधर , व एनसीसी कॅडेट पूर्ण झालेल्या सध्या  पोलिस   भरतीची तयारी करत असलेल्या मुली संपर्कात आल्या, यांना  महिला समता सैनिक दलाच्या निर्मीतीत सहभागी होण्याबाबत  अमरसिंहढाका विचारणा यांनी विचारणा  करताच त्यांनी लगेच होकारार्थी सहमती दर्शविली .  मुली जर  समता सैनिक 

दलात सामील झाल्या तर त्यांना पोलीस भरतीसाठी अथवा एम.पी.एस.सी.च्या स्पर्धा  परीक्षेची तयारी करणे नक्कीच सोपे जाईल. कारण समता सैनिक दलातून सहास , आत्मविश्वास ,हे गुण वाढीस लागुन,स्वंय कोणतीही जबाबदारी सहज त्या पार पाडू शकतात . तरी अशा होतकरू मुलींनी महिला समता सैनिक दलात सामील होत आपला विकास साधण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहनही अमरसिंह ढाका  यांनी केले आहे .जर प्रत्येक कुटूंबात एक समता सैनिक दलाची महीला  असेल तर,  ती संपुर्ण  कुटुंब बुद्ध धम्म सुसंस्कारातून व बाबासाहेबांच्या विचार श्रणीतून  अवश्य घडवू शकेल.या सर्व बाबीचा विचार करता बीड महिला समता सैनिक दल प्रमुख म्हणून होतकरू सायन्स  पदवीधर व कॅडेट पूर्ण झालेली मुलगी  कु. पल्लवी वाघमारे हिची  बीड शहर महिला समता सैनिक दल  प्रमुख म्हणून निवड केली आहे. तर कोमल  वाघमारे , किरण गायकवाड या  सुद्धा या  दलाची कु. पल्लवी वाघमारे ची  सहचारिणी 

असेल.आता बीड शहर   महिला समता सैनिक दलाची जबाबदारी या मुलीं सांभाळणार आहेत . या त्यांच्या कृतीशील  जबाबदारीचे  भान ठेवत.अमरसिंह ढाका यांनी  दोन्ही मुलीचे उत्स्फूर्त पणे  स्वागत करत त्यांना पंचशील ध्वजाचे टी-शर्ट भेट देत  अभिनंदन केले. कु. पल्लवी वाघमारे,कोमल वाघमारे  प्रमाणेच इतर मुलींनीही  या महिला समता सैनिक दलात सामील व्हावे असे आवाहन अमरसिंह ढाका  यांनी केले आहे.  जर मुली महिला समता सैनिक दलात सामील झाल्या तर अशा मुलीकडून बुद्ध धम्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चा गाढा अभ्यास करून घेणे सोपे जाईल. म्हणून  येत्या  16 मे च्या बुद्ध जयंती पर्यंत किमान दहा मुलींचे समता सैनिक दल (पथक) तयार करावयाचे आहे. ज्या मुलींना उस्फूर्तपणे या दलात सामील होऊन  भावी जीवनाची उन्नती साधावयाची   आहे अशा मुलींनी  कु. पल्लवी  वाघमारे (9067962230) व अमरसिंह ढाका  ( 9822324346) या वर  त्वरित संपर्क  संपर्क साधावा असे आव्हान अमरसिंह ढाका यांनी  केले आहे. केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा