Subscribe Us

header ads

वांजरा फाट्याजवळ कारच्या भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू;

बीड स्पीड न्यूज 


वांजरा फाट्याजवळ कारच्या भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू;


पाटोदा प्रतिनिधी-:पाटोदा गावाजवळील वांजरा फाटा येथे कारच्या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये प्रवास करणारे अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पाटोदा गावाजवळ वांजरा फाटा येथे कारला हा भीषण अपघात 

झाला. कारमध्ये उस्मानाबादमधील भूम येथील रहिवासी अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी होते. या कारचा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही एखाद्या भरधाव वाहनाने कारला धडक दिल्याचे अपघात स्थळावरील दृश्यांतून दिसत आहे. कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा