Subscribe Us

header ads

धारूरमध्ये चोरीच्या उद्देशाने हातपाय बांधून व्यापाऱ्यास बेदम मारहाण

बीड स्पीड न्यूज 


धारूरमध्ये चोरीच्या उद्देशाने हातपाय बांधून व्यापाऱ्यास बेदम मारहाण


धारूर प्रतिनिधी-:  येथील आडत व्यापारी मारुतिराव गायके हे गंभीर जखमी, हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २५ सोमवारी आडत व्यापारी मारुतिराव गायके हे खाजगी कामानिमित्त केज येथे गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत परत आले नसल्याने नातलगांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास केज रस्त्यावर शोध घेतला असता कासारी पाटीजवळ गायके यांची दुचाकी पडलेली दिसली. शोधाशोध केला असता काही अंतरावर हातपाय बांधलेल्या व गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत व्यापारी गायके हे दिसून आले  त्यांच्या पाठीवर व मांडीवर अज्ञात धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत. त्यांना तात्काळ धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक अवस्थेत उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे धारुर शहरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्याला चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक व्हि.एस.आटोळे यांच्याशी संपर्क केला असता सदर व्यक्ती घरी परत आला नसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिचा पोलिसांनी शोध घेतला. यावेळी केज रस्त्यावर कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते बेशुद्ध अवस्थेत असून तपास सुरु असल्याची माहिती दिली. याबाबत अद्याप कसलाही गुन्हा नोंद नाही. सकाळीच पोलिस अंबाजोगाई रुग्णालयाकडे पुढील तपासासाठी गेले असल्याचे माहिती आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा