Subscribe Us

header ads

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळचा गेल्या तीस वर्षापासुन चा प्रश्न अखेर लागला मार्गी

बीड स्पीड न्यूज 


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळचा गेल्या तीस वर्षापासुन चा प्रश्न अखेर लागला मार्गी 

नगरसेवक अँड विकास जोगदंड यांचा पाठपुरावा

दोन दिवसापूर्वी नगरसेवक अँड विकास जोगदंड आणि महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांचेत झाला होता शाब्दिक वाद 

बीड (प्रतिनिधी) 9 एप्रिल बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या च्या वरील बाजूने लोंबकाळलेल्या विद्युत वाहीका (तार) तसेच रस्त्याच्या मद्योमत असलेले विद्युत खाबं विद्युत वितरण कंपनी ने अखेर बाजूस घेतले असून भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच भिम स्वराज्य संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे समाज बांधवांच्या साथीने हा प्रश्न मार्गी लागला आहे. या लोंबकाळलेल्या तारे मुळे भविष्यात जीवित हानी होऊन दुर्घटना घडली असती याचे गांभीर्य भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब प्रत्यक्षात विद्युत वितरण कंपनी च्या निदर्शनास आणून दिली दोन चं दिवसांपूर्वी याबाबत महावितरण कंपनी चे अधीक्षक अभियंता कोलप आणि नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्यात वाद झाला होता. डॉ आंबेडकर यांची जयंती अवघ्या सहा दिवसांवर आली असून पुतळ्या जवळील तारेचा गेल्या तीस वर्षा पासूनचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने समाज बांधवातून समाधान व्यक्त होत आहे. आज महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी च्या वतीने डॉ 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या वरील तारा व खाबं बाजूला घेण्याचे काम सुरु असून याप्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी कामांची पाहणी करत संबंधित विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे आभार मानत काम व्यवस्थित करणे बाबत सूचना दिल्या यावेळी राज्य प्रवक्ते अशोक कांबळे, मंगेश जोगदंड, सचिन जाधव, महादेव वंजारे,जय हिंद इलेक्ट्रीकल चे खय्युम इनामदार,
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ बाळू जोगदंड,राहुल जोगदंड,मुखीद पटेल,शंकर मवाले, एकनाथ हुंबे व कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा