Subscribe Us

header ads

ना.धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे व एस.एम. देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी परळीत पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांचे होणार वितरण

बीड स्पीड न्यूज 


ना.धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे व एस.एम. देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी परळीत पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांचे होणार वितरण

समाजकार्यासाठी संपादक चंदुलाल बियाणी, संपादक आत्मलिंग शेटे, बालासाहेब कडबाने यांना जीवन गौरव पुरस्कार तर रामप्रसाद गरड यांना दर्पण पुरस्कार यांचा होणार गौरव


परळी,( प्रतिनिधी):-परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून देण्यात येणार्या  यंदाच्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 10 एप्रिल 2022  रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम.देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यनाथ औद्योगिक वसाहत येथे सायंकाळी 6 वा. होणार आहे. अशी माहिती पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, नगर परिषदेचे  गटनेते वाल्मीक अण्णा कराड, तर प्रमुख पाहुणे म्हणून  नगराध्यक्षा सरोजताई हालगे, काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवकन्याताई शिरसाट, गटनेते अजय मुंडे, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, मार्केट कमिटीचे सभापती  गोविंद फड, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी, उपजिल्हा रुग्णालय परळीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, राष्ट्रवादीचे नेते राजकिशोर मोदी, भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर मामा चाटे, दैनिक चंपावतीपत्र चे संपादक नामदेव क्षीरसागर ,परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात 

उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चंदुलाल बियाणी  यांना विशेष पुरस्कार तर गेल्या तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार व परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे, दैनिक जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांना जीवनगौरव  पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दर्पण पुरस्कारासाठी दैनिक वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड यांची निवड करण्यात आली आहे.जेष्ठ संपादक काशिनाथराव वरपे स्मृती पुरस्कारासाठी दै.परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, जेष्ठ संपादक मोहनलाल बियाणी स्मृती पुरस्कारासाठी झुंजारनेताचे पत्रकार प्रकाश चव्हाण,  संपादक भास्करराव जोशी स्मृती पुरस्कारासाठी दै. लोकप्रभाचे उपसंपादक अनंत कुलकर्णी, एम.पी.कनके स्मृती पुरस्कारासाठी दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे वृत्तसंपादक अनुपकुमार कुसुमकर, जेष्ठ संपादक श्रीमती राजामती अंकलकोटे स्मृती पुरस्कारासाठी एच. डब्ल्यू. चॅनलच्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे, जेष्ठ पत्रकार कैलास शर्मा स्मृती पुरस्कारासाठी दै.लोकमतचे पत्रकार संजय खाकरे, जेष्ठ पत्रकार प्रकाश नव्हाडे स्मृती पुरस्कारासाठी दै.पुण्यनगरीचे पत्रकार धनंजय आरबुने, संपादक तुळशीराम मुंडे स्मृती पुरस्कारासाठी दै.सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांची निवड करण्यात आली आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते विशेष समारंभात रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा