Subscribe Us

header ads

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यात जिज्ञासा महत्त्वाची- प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे नालंदा फाउंडेशन च्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध

बीड स्पीड न्यूज 

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यात जिज्ञासा महत्त्वाची- प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे नालंदा फाउंडेशन च्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध


बीड(प्रतिनिधी):- स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यात जिज्ञासा महत्त्वाची असून त्यामुळेच विद्यार्थी आपल्या यशाचे शिखर गाठू शकतो असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. नालंदा फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप,जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि कोणती पुस्तके वाचावी, अभ्यास कसा करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा पेपर सोडवताना अडचण निर्माण होणार नाही याची सविस्तर माहिती दिली. यावेळी महावितरण अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप,कर सल्लागार बी.बी.जाधव,सत्यशोधक ओबीसी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप उपरे,हिंदी विभाग प्रमुख बलभीम कॉलेज डॉ.बाबासाहेब कोकाटे,निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, इंजि.वचिष्ट तावरे,इंजि.भोलेनाथ मुने,धनगर समाज कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश निर्मळ,क्रांतिवीर बिरसा मुंडा सामाजिक संघटना बीड जिल्हा अध्यक्ष सुनिल बळवंते यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना तुषार ठोंबरे म्हणाले की, अभ्यास करत असताना आनंदी असले पाहिजे कारण आनंदातूनच समाधान मिळते आणि अभ्यास करण्याची गोडी निर्माण होते. विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यास करावा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राध्यापक प्रदीप रोडे यांनी नालंदा फाउंडेशनचा उद्देश स्पष्ट केला आहे ते बोलताना म्हणाले की, बीड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना पैशांअभावी स्पर्धा स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यास अडचण निर्माण होते. महागडे पुस्तक ते खरेदी करू शकत नाही आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेसही आर्थिक अडचणीमुळे ते लावू शकत नाहीत त्यामुळे अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी नालंदा फाउंडेशन पुढे आले असून  विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात आले आहे.  बीड जिल्ह्याचे नाव ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते मात्र हे नाव पुसून आता अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून बीड चे नाव लौकिक करावे आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन मोठ्या पदावर जाण्यासाठी अभ्यास करावा असे प्रा.प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोहर सिरसाट यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य पांडुरंग सुतार यांनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा