Subscribe Us

header ads

महाराष्ट्र विधुत वितरण कंपनीचे मगरूर आणि अकार्यक्षम अधीक्षक अभियातां कोलप यांचा जाहीर निषेध

बीड स्पीड न्यूज 

महाराष्ट्र विधुत वितरण कंपनीचे  मगरूर आणि अकार्यक्षम अधीक्षक अभियातां कोलप यांचा जाहीर निषेध

बीड प्रतिनिधी-:विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त नगर परिषदे च्या वतीने पेठ बीड भागातील पुतळ्यास दर वर्षी सुशोभीकरण करण्यात येते पेठ बीड उत्सव समितीच्या विनंती सूचनांवरून या वर्षी आधुनिक पद्धतीने पुतळ्यास सजावट करावयाची असल्याने पुतळ्याच्या वरच्या बाजूने गेलेल्या विधुत वाहक (तार) तसेच विद्युत खांब बाजूला घेणे संदर्भात विद्युत विभागाचे मा कार्यकारी अभियातां बीड यांना महामानव जन्मोत्सव समिती च्या वतीने भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक विकासजी जोगदंड यांनी महिन्या भरापूर्वी निवेदन दिले होते. तसेच अधीक्षक अभियातां कोलप यांना देखील वारंवार विनंती करून दूरध्वनी द्वारे संपर्क करून सदरील मागणी संदर्भात पाठपुरावा केला. असून आज दिनांक 7 एप्रिल रोजी दूरध्वनीवरून नगरसेवक विकास जोगदंड यांनी संपर्क साधुन विनंती केली असता उद्धट पणाने कोलप बोलत आहेत. महामानवांच्या प्रति अशा अधिकाऱ्याच्या मनात किती आदर आहे. हे त्यांच्या अकार्यक्षम कृतीतून स्पष्ट होत आहे.अशा अधिकाऱ्याचा जाहीर निषेध
उद्या या संदर्भात भिम स्वराज्य सेनेच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने मा मुख्यमंत्री आणि मा ऊर्जा मंत्री यांना लेखी तक्रार निवेदन देण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा