Subscribe Us

header ads

ऐन उन्हाळ्यात महावितरणने दिला जनतेला शॉक; बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनिमयन!

बीड स्पीड न्यूज 


ऐन उन्हाळ्यात महावितरणने दिला जनतेला शॉक; बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनिमयन!


बीड-: वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाहू लोहान होत असताना महावितरणने बीड जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला आहे. विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, लोडशेडींगचे वेळापत्रक बाबत अद्याप नियोजन झालेले नाही. अचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे शेतकऱ्यांचे बेहाल होणार आहेत.
महावितरणकडून आज अधिकृत निवेदन जारी करून सर्वांना सुचना देण्यात आली आहे. या सुचनेत त्यांनी म्हटले आहे की महावितरणतर्फे बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, शिरूर, पाटोदा आणि आष्टी उपविभागात विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन (इमर्जन्सी) करावे लागत आहे. सदरच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की आपण महावितरणला सहाकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोळशाची टंचाई

संपूर्ण राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मीतीचे काही ठिकाणचे संच बंद आहेत. त्यात उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणीची वीज गूल

काल रात्री आठ वाजल्यापासूनच इर्मजन्सी लोडशेडींग सुरु झालेले आहे. काल अर्धे बीड शहर आणि अर्ध्या जिल्ह्यातील वीज रात्री आठच्या सुमारास गूल झालेली होती. ती थेट पहाटे अडीचच्या दरम्यान आली. त्यामुळे शहरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर शेतकऱ्यांना ऊस आणि भाजीपाल्याच्या शेतीला याचा जबरदस्त फटका बसणार आहे.

लोडशेडींगचे वेळापत्रक नाही

वीजेची मागणी अचानकपणे वाढत आहे त्यामुळे कुठल्या भागात कोणत्या वेळेत लोडशेडींग करायचे याबाबत नियोजन झालेले नाही. तरीही ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला ठरवला गेला असल्याची माहिती सुत्रांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा