Subscribe Us

header ads

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चा अनोखा उपक्रम - पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत


बीड स्पीड न्यूज 


दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चा अनोखा उपक्रम - पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत 

परळी ( प्रतिनिधी) परळी येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलने नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबांचे पुष्प देवून स्वागत केले. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पहायला मिळाले. आज बुधवार दि 6  एप्रिल 2022 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे शाळेच्या प्रांगणात खुद शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनोभावे स्वागत केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून शिक्षकांचे मन भरून आले व यापुढे कोरोणाच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना केली. दोन वर्षाच्या करोना महामारीनंतर यावर्षी विद्यार्थ्यांना पुर्ण शैक्षणिक वर्ष शाळेत यायला मिळेल असे संकेत दिसत आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गजबजाट पाहायला मिळाला. अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांना दोन वर्ष भेटू शकले नाहीत. विद्यार्थ्यामध्ये एकमेकांना भेटण्याची उत्सुकता दिसून आली.विवेकानंद  वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांनी सर्व विद्यार्थांचे मनःपूर्वक स्वागत केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तेजेश कुमार शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा