बीड स्पीड न्यूज
विद्युत वितरण कंपनीचे मगरूर अकार्यक्षम अधीक्षक अभियंता कोलप यांना निलंबित करा भिम स्वराज्य सेनेच्या शिष्टमंडळाची मागणी
बीड (प्रतिनिधी) 8 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त नगर परिषदे च्या वतीने पेठ बीड भागातील पुतळ्यास दर वर्षी सुशोभीकरण करण्यात येते गेल्या दोन वर्षापासुन कोरोना या जागतिक संकटामुळे जयंती उत्सवावर निर्बंध आल्याने जयंती उत्सव साजरा करता आला नाही निर्बंध शिथिल झाल्याने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यासाठी प्रत्येक उत्सव समिती कार्यरत असून डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पेठ बीड उत्सव समितीच्या विनंती सूचनांवरून या वर्षी आधुनिक पद्धतीने सजावट करावयाचे नियोजन असल्याने पुतळ्याच्या वरच्या बाजूने गेलेल्या विद्युत वाहक (तार) तसेच विद्युत खांब बाजूला घेणे गरजेचे असून या लोंबकाळलेल्या तारांमुळे सजावटीस बाधा येत असून जीवित हानी देखील होऊ शकते म्हणून या संदर्भात विद्युत विभागाचे मा कार्यकारी अभियातां बीड यांना महामानव जन्मोत्सव समिती च्या वतीने भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी महिन्या भरापूर्वी निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाची योग्य दखल घेतली गेली नसल्याने अधीक्षक अभियातां कोलप यांना याबाबत वारंवार विनंती करून दूरध्वनी द्वारे संपर्क करून सदरील मागणी संदर्भात पाठपुरावा केला आहे. तरी देखील कसल्याही प्रकारचा प्रतिसाद विद्युत विभागाने दिला नाही जयंती उत्सव अवघ्या 10 दिवसांवर आला आहे. समाज बांधवांच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने दिनांक 7 एप्रिल रोजी दूरध्वनीवरून नगरसेवक विकास जोगदंड यांनी अधीक्षक अभियातां कोलप यांना संपर्क साधुन विनंती केली असता कोलप यांनी उद्धट पणाने बोलत मीच आलो की सगळं आला का यापूर्वी कशी सजावट होतं होती. आमच्याकडे निधी नाही अशी मगरुरी करत महामानवांच्या प्रति अशा अधिकाऱ्याच्या मनात किती आदर आहे. हे त्यांच्या अकार्यक्षम कृतीतून स्पष्ट झाले आहे. एका संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांना आपण कुठल्या भाषेत बोलत आहोत याचे देखील भान या अधिकाऱ्याला नसल्याने अशा अधिकाऱ्याला समाज बांधव लोकशाही मार्गने उत्तर देणार असून अकार्यक्षम कर्तव्यात कसूर करणाऱ्या उद्धट अधीक्षक अभियातां कोलप यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या आजपर्यँतच्या सर्व कारभारची, कार्यकाळाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे राज्य प्रवक्ते अशोक कांबळे,राजेश कोकाटे,मंगेश जोगदंड,सचिन जाधव, विष्णू गायकवदड, महादेव वंजारे, गोरख जोगदंड, सुनील वंजारे, उज्वल कोरडे,सह आदींनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री तसेच मा ऊर्जा मंत्री यांना निवेदना द्वारे केली आहे.
0 टिप्पण्या