Subscribe Us

header ads

अंबाजोगाई नजीक शेपवाडीत पुजाऱ्याचा खून


बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई नजीक शेपवाडीत पुजाऱ्याचा खून



अंबाजोगाई-: अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे हनुमान मंदिराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. ०२) दुपारी १ वाजता घडली. संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक