Subscribe Us

header ads

क्षीरसागर कुटुंबीयांचे सांत्वन लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिला आधार

बीड स्पीड न्यूज 


क्षीरसागर कुटुंबीयांचे सांत्वन लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिला आधार



बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या स्व.रेखाताई क्षीरसागर यांचे काही दिवसांपूर्वी दुखःद निधन झाले होते.या अनुषंगाने 

क्षीरसागर कुटुंबीयांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे.बुधवार दि.२१ रोजी स्व.रेखाताई क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 

दुखःद निधन झाले होते.या दुखःद घटनेने क्षीरसागर कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर‌ कोसळला आहे.या दुखःत आधार देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्षीरसागर यांच्या 

निवासस्थानी येऊन कुटुंबीयांचे सांत्वन‌ केले आहे.दरम्यान महंत डॉ.नामदेव महाराज ‌शास्त्री,ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे,नारायणगड संस्थानचे महादेव महाराज, गोरक्षनाथ टेकडी संस्थानचे नवनाथ 

बाबा,दगडवाडी देवस्थानचे महाजन महाराज, माजी मंत्री अशोकराव पाटील,आ.रोहीत दादा पवार,आ.विक्रम काळे,आ.लक्ष्मण पवार,आ.सुरेश धस,आ.रत्नाकर गुट्टे,आ.सुनील भुसारा,आ.सतिष चव्हाण,आ.इंद्रनील नाईक, अनिल जगताप, राजेसाहेब देशमुख,सुदामती गुट्टे,रविराज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील तसेच राज्यातील मान्यवरांनी निवासस्थानी भेट देऊन,आ.संदीप क्षीरसागर,रविंद्र दादा क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जून क्षीरसागर यांच्यासह सर्व कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.यावेळी आलेल्या मान्यवरांनी क्षीरसागर कुटुंबीयांना या दुखःतून सावरण्याची शक्ती मिळो,या दुखःप्रसंगी आम्ही क्षीरसागर कुटुंबीयांसोबत असून स्व.रेखाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा