Subscribe Us

header ads

जरुड येथे रथाखाली चेंगरून तरुण ठार

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


जरुड येथे रथाखाली चेंगरून तरुण ठार



वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील जरूड येथे भैरवनाथ ची पारंपरिक यात्रा ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात भरते हजारो भाविक या यात्रेत येतात या यात्रेत भैरवनाथाचा रथ ओढण्याच्या कार्यक्रम प्रत्येक वर्षी होतो.या वर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा भरली हजारो भाविक यात्रेत आले. काल दिनांक २४ एप्रिल वार रविवार रोजी रथ ओढण्याचा कार्यक्रम सुरू असताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली याचं गर्दीतील बाबुराव बरडे (वय १५ वर्षे) राहणार जरूड हा तरुण अचानक या रथाच्या चाकाखाली आला रथाचे चाक अंगावरून गेले असता तो जाग्यावर बेशुध्द झाला स्थानिक नागरिकांनी लगेच त्याला दवाखान्यात नेण्यासाठी उचलले पण दवाखान्यात नेत आसतांना वाटेतच बाबुराव बरडे याची प्राणज्योत मावळली त्याच्या जाण्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा