Subscribe Us

header ads

पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर तर प्रियकर ठार;आरोपी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन

बीड स्पीड न्यूज 

पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर तर प्रियकर ठार;आरोपी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन


गेवराई-:पत्नीचे पर पुरुषासी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून पतीने पत्नी व तिच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना गुरुवारी ( दि. १४ ) रात्री ९ च्या सुमारास तळणेवाडी ( ता. गेवराई ) येथे घडली आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून प्रियकर ठार झाला आहे. बबन ज्ञानोबा खरसाडे ( वय ४५ वर्ष ) असे मयताचे नाव असून, याचे व गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सदरील महिलेच्या पतीने गुरुवारी ( दि. १४ ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पत्नी व प्रियकर असलेल्या बबन वर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियकर ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. काही लोकांनी मदत करत जखमीला तातडीने उपचारासाठी गेवराई येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. हल्ला करुन पती घटनास्थळावरून पसार झाला असून महिले ची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुकाराम बोडखे, पोह. उबाळे, पो.नि. शेखर हिंगेवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. व घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेतील आरोपी स्वतः शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला असून त्याला गेवराई पोलिसांच्या ताब्यात घेणार असल्या ची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक