Subscribe Us

header ads

शिक्षणामुळे कुळांचा उद्धार होतो; उपशिक्षणाधिरी नानाभाऊ हजारे यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


शिक्षणामुळे कुळांचा उद्धार होतो; उपशिक्षणाधिरी नानाभाऊ हजारे यांचे प्रतिपादन



बीड/ प्रतिनिधी-:शिक्षणामुळे कुळांचा उधार होतो, म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडता काम नये असे प्रतिपादन उपशिक्षणाधिरी नानाभाऊ हजारे  यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्या  सप्ताहात बुधवार  (ता. १३)  रोजी सलग अठरा तास अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उद्घाटक स्थानावरून नानाभाऊ हजारे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, विषेश उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाचे सदस्य बन्सी हावळे, डॉ. बाळासाहेब जावळे, सुनिल डोंगरे,यांची उपस्थिती होती.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नानाभाऊ हजारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्ववता अथांग महासागरासाखी आहे. आपण आठरा तास अभ्यास केलात ही बाब कौतुकाची आहे. मात्र केवळ एक दिवसाचे औचित्य साधून चालणार नाही. त्यामुळे अभ्यासातले सातत्य कायम असणे आवश्यक आहे. बार्टीने दिलेल्या संधीचे आपण सोने केले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे या सुविधा तुम्हाला मिळत आहेत. प्रज्ञा, शील, करुणेचा विचार अंगिकारुण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज आणि  क्रांती घडवा असे मत उपशिक्षणाधिरी नानाभाऊ हजारे यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) मान्यताप्राप्त, सम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रचे अध्यक्ष राहुल वाघमारे, केंद्र प्रमुख प्रा. यशवंत वावळकर , सहाय्यक केंद्र प्रमुख प्रा. अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, अंबिका शिंदे, प्रा. अमोल क्षीरसागर, प्रा. शिवाजी रूपनर, प्रा. भरत खेत्री, सचिन मेरूकर, अनिल डोंगरे, विनोद जोगदंड, राहुल शिंदे, मुकेश निसर्गंध,दीपालीताई निर्मळ  यांनी मोलाचे परिश्रम घेवून आठरा तास अभ्यास कार्यक्रम यशस्वी केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा