Subscribe Us

header ads

पोलिस अधिकारीच झाला पोलिसाचा वैरी; सामान्यांचा मग कोण वाली.?

बीड स्पीड न्यूज 


पोलिस अधिकारी च झाला पोलिसाचा वैरी; सामान्यांचा मग कोण वाली.?




माजलगाव: प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या अनागोंदीने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके, संदिप क्षीरसागर यांनी निदर्शनास आणुन दिले होते त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांची तातडीने बदली करुन अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांची पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण त्याच दर्जाचे माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सुनिल जायभाये यांना पदभार देण्यात आला आहे. यापदाचा वापर अवैध गुटखा, वाळु,रेनशचे धान्य,मटका किंग ,पत्याचे कल्ब चालवणाऱ्यां विरोधात कारवाई करण्या ऐवजी पोलिसांनाच अर्वाच भाषेत शिविगाळ करुन पोलिस ठाण्यातील शासकिय मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार एका पोलिस जमादाराने पोलीस अधीक्षक व गृहमंत्रालया कडे केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत माजलगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तक्रारदार जमादार राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ठाण्याच्या आवारात लोकांना का बसू दिले म्हणत जायभाये यांनी आई बहिणीवर शिवीगाळ करून आवारात असलेले बेंच पाडुन नासधुस केल्याची घटना १६एप्रिल शनिवार रोजी घडली याबाबत पोहेकां.शंकर राठोड यांनी १७एप्रिल रोजी रोजी दिलेल्या तक्रारीनंतर माजलगाव ग्रामिण पोलिस ठाण्याचा जा.क्रं.-६४१/२०२२ दिनांक १८/०४/२०२२ रोजी तक्रारदार पोलीस शिपाई एस. एच. राठोड हे कर्तव्यावर असताना दुपारी ४ वा. सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये हे ग्रामीण पोलीस स्टेशनला आले. ते आल्यानंतर त्यांना रीतसर सॅल्युट दिला असता त्यांनी ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले असा प्रश्न विचारल्यानंतर अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी कांही तर कांही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे उत्तर राठोड यांनी दिले. अचानकच जायभाये यांचा पारा चढला व त्यांनी येथील 
बेंच तोडण्याचे फर्मान काढले तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड यांना तर सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत सिमेंटचे बेंच तोड म्हणू लागले. राठोड यांनी माझा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले असता तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकील. तुला सस्पेंड करील, मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली आता तुझी पण वाट लावतो म्हणत गलिच्छ शिवीगाळ करून सर्वांसमक्ष अपमानित केले तसेच या सर्व प्रकरणी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत कांही अनुचित घडले तर त्यास जायभाये हेच जबाबदार असतील आशा आशयाची तक्रार पोलीस शिपाई एस. एच. राठोड यांनी ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे.यावरुन तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे. की, "पोलिस अधिकारीच पोलिसाचा वैरी मग सामान्य माणसांच्या रक्षणासाठी कोण वाली."दरम्यान जायभाये यांच्या या कृत्यामुळे जे फिर्याद दाखल करण्यासाठी आले होते त्यांनाही दमदाटी करून एका दलित व्यक्तीची फिर्याद घेतली नाही उलट बेंच पाडायला भाग पाडले. असा सवाल उपस्थित होत असून अशा अधिकाऱ्यांची पाठराखण करणारे सत्ताधारी, विरोधी बडे राजकिय नेते ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी करतातच हे नाकारता येणार नाही. 



-----------------------------------.
तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे चौकशी झाली की खरं,खोट उघड होईल की, वास्तव काय आहे त्यामुळे जास्त प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.- 
जायभाये. उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव.
-------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा