Subscribe Us

header ads

तलवाड्यात उसाच्या शेतात गांजाची लागवड;डिवाएसपी स्वप्नील राठोड यांची कारवाई, आरोपी ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

तलवाड्यात उसाच्या शेतात गांजाची लागवड;डिवाएसपी स्वप्नील राठोड यांची कारवाई, आरोपी ताब्यात


गेवराई प्रतिनिधी-: तालुक्यातील तलवाडा येथे ऊसाच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळाली होती सदर माहितीच्या आधारे राठोड यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांच्या पथकासह त्या शेतावर छापा मारला. यावेळी शेतातून गांजाची २२ झाडे जप्त करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील तलवाडा येथील त्वरिता देवी मंदिराच्या पायथ्याशी बाळू अंकुश खवाटे यांची शेती असून त्यांनी ऊसात गांजाची झाडे लावली आहेत. ती सध्या डोक्याऐवढी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळताच त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना सोबत घेऊन पथकासह खवाटे यांच्या शेतात धाड टाकली. यावेळी ऊसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास २२ गांजाची झाडे जवळपास पाच ते सहा फुट वाढलेली आढळून आली. याचे वजन १८ किलो आहे. हि सर्व झाडे पोलिसांनी जप्त करत आरोपी बाळू खवाटे राहणार तलवाडा यांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर,तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे, उपनिरीक्षक बाळासाहेब भुवर, सचिन अलकट, मंडळ अधिकारी, तलाठी राहुल गायकवाड सह आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा