Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करणार्‍या दबंग पोलीस अधिकारी पंकज कुमावत दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून भारतीय संविधानाने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करणार्‍या दबंग पोलीस अधिकारी पंकज कुमावत दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून भारतीय संविधानाने सन्मानित 


बीड (प्रतिनिधी)ः- गेल्या अनाधी कालावधीपासून बीड जिल्ह्यात विविध स्वरूपाची गुन्हेगारी वसलेली असून ही गुन्हेगारी आपल्या दबंग कर्तृत्वाने मोडीत काढण्याकरीता अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे बीड जिल्हावासीयांना मौलिक योगदान लाभलेले आहे. त्यांच्या दबंक कर्तृत्वाचा धसका आजतागायत जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारी करणार्‍या गुन्हेगारांना बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीक, वंचित सामाजिक घटक, दिव्यांग व्यक्ती यांनाही त्यांच्या कर्तृत्वाचा सदोपयोग झालेला आहे. याच बाबींची शासन मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटनेने गंभीर दखल घेवून संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी पंकज कुमावत यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना सन्मानित करण्याविषयी स्वतंत्र भेट घेण्याची विनंती केली असता संघटनेच्या विनंतीस कुमावत यांनी मान देवून आज दि. 20 एप्रिल 2022 रोजी शासकीय पोलीस विश्रामगृह बीड येथे त्यांना भारतीय संविधानाची अद्यायावत प्रत सन्मानपूर्वक भेट देवून दिव्यांग कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. या प्रसंगी सन्मानीत झाल्यानंतर कुमावत यांनी संघटना पदाधिकार्‍यासमवेत संवाद साधतांना सांगितले की, या पुढे मी सामाजिक, वंचित घटकांचा आवाज बनून राहील. या प्रसंगी सन्मान करतांना अशोक आठवले यांच्यासह बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्वरूपाची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी कळवले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा